Punjab Kings vs Gujarat Titans 
क्रीडा

PBKS vs GT: गुजरातच्या संघाने बदला घेत बदललं Point Tableचं गणित; ३ विकेट राखत मिळवला विजय

Punjab Kings vs Gujarat Titans: सुपर संडेमधील दुसरा सामना अधिक रोमांचक ठरला. माफक आव्हान पार करताना गुजरातच्या संघाला घाम फुटला होता.

Bharat Jadhav

Punjab Kings vs Gujarat Titans: सुपर संडेमधील दुसरा सामना अधिक रोमांचक ठरला. माफक आव्हान पार करताना गुजरातच्या संघाला घाम फुटला होता. पण राहुल तेवतियाच्या संयमीखेळीमुळे गुजरातने पराभवाचा बदला घेतला. मोहाली येथील मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने १४२ धावा करत गुजरातसमोर १४३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना गुजरातच्या संघाला आपले ७ गडी गमावावे लागले. अखेर राहुल तेवतियाने गुजरातची लाज राखली.

मागील सामन्यात पंजाबने तीन विकेट राखत विजय मिळवला होता. हा सामना अहमदाबादमध्ये झाला होता. या पराभवाचा बदला गुजरातने घेत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी भरारी घेतलीय. दिल्ली आणि मुंबईला पिछाडत गुजरातने थेट सहाव्या स्थानावर झेप घेतलीय. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने १४३ धावांचे माफक आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाने हे आव्हान १९.१ षटकात ७ विकेट गमावत पूर्ण केलं.

आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलने ३५ धावांची खेळी केली. तर रद्धिमान साहाने १३ धावा केल्या. साई सुदर्शनने ३१ धावा, उमरजेई १३, डेविड मिलर ४ , शाहरुख खान या सामन्यात ८ धावा केल्या. तर राहुल तेवतियाने नाबाद ३६ धावा करत आपल्या संघाला विजय मिळून दिला. दरम्यान या मोसमात गुजरातचा ८ व्या सामन्यातील हा चौथा विजय आहे. तर पंजाबचा ८व्या सामन्यातील सहावा पराभव आहे.

गुजरात संघाचे प्लेइंग ११

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, नूर अहमद, संदीप वारियर, मोहित शर्मा.

पंजाब किंग्सचे प्लेइंग ११

सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिले रोसो, लियाम लिव्हिंगस्टन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT