IPL2024: कॅमेरूनने घेतला उंचीचा योग्य फायदा; हवेत उडी मारत पकडला ८ फुटावरील अप्रतिम झेल

Ipl 2024 Rcb Vs Kkr : आयपीएल २०२४ मधील ३६ वा सामना कोलकता नाईटरायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये झालाय. हा सामना कॅमेरून ग्रीनने एक शानदार झेल घेतलाय.
IPL2024: कॅमेरूनने घेतला उंचीचा योग्य फायदा; हवेत उडी मारत पकडला ८ फुटावरील अप्रतिम झेल
X John
Published On

आज आयपीएलचा ३६ वा सामना केकेआर आणि आरसीबीमध्ये झाला. या सामन्यात आरसीबीचा दारुण पराभव झाला. अखेरच्या चेंडूपर्यंत बेंगळुरुच्या संघाने झुंज दिली. कर्ण शर्मा विजय मिळून देईल असं वाटत असताना शर्मा झेलबाद झाला आणि आरसीबीला एका धाव संख्येने सामना गमवावा लागला. दरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी कॅमरून ग्रीनची उत्तम क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम झेल पाहण्यास मिळाला.

फलंदाजी करताना केकेआरने चांगली सुरुवात केली, परंतु यश दयालने बंगळुरूचे शानदार पुनरागमन केलं. त्याने एकामागून एक २ विकेट घेतल्या. त्याच्या तिसऱ्या विकेटमध्ये कॅमेरून ग्रीनचे महत्त्वाचे योगदान होते. ग्रीनने हवेत उडी मारत अप्रतिम झेल घेतला.

आरसीबीसाठी पॉवरप्लेचे शेवटचे षटक यश दयालने टाकले. मिड-विकेटच्या ओव्हरच्या सहाव्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीने फटका मारण्याचा प्रयत्न केला.याचदरम्यान कॅमेरून ग्रीनने त्याच्या उंचीचा फायदा घेत हवेत उडी मारली आणि एका हाताने ८ फूट उंचीवरून जाणारा चेंडू पकडला. यामुळे रघुवंशीला अवघ्या ३ धावांवर माघारी तंबूत जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com