IPL 2024
IPL 2024  Saam tv
क्रीडा | IPL

IPL 2024 Points Table: हैदराबादची भरारी, चेन्नईच्या पराभवाचा २ संघांना फटका; गुणतालिकेत झाली मोठी उलथापालथ

Vishal Gangurde

IPL 2024 Points Table Update :

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने आयपीएलच्या १८ व्या सामन्यात चेन्नईला ६ गडी राखून धूळ चारली. सनराइजर्स हैदराबादने विजय मिळविल्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. हैदराबादने विजयानंतर गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर चेन्नई दोन पराभवानंतरही गुणतालिकेत टॉप-४ मध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीचे दोन सामने जिंकून धमाकेदार एन्ट्री केली. मात्र, त्यानंतर चेन्नईला दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबादच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. या दोन पराभवामुळे चेन्नई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. चेन्नईचा रन रेट इतर चार संघापेक्षा चांगला आहे. यामुळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सामना होण्यासाठी हैदराबादचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. चेन्नईला धूळ चारल्यानंतर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबा चांगल्या रन रेटमुळे लवकरच टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे.

हैदराबाद आणि चेन्नईमध्ये कसा सामना झाला?

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने २० षटकात १६५ धावा कुटल्या. शिवम दुबेला सोडून चेन्नईच्या सर्वच फलंदाज हैदराबादच्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले. हैदराबादच्या भेदक मारा करत चेन्नईवर दबाव कायम ठेवला. हैदराबादच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे चेन्नईच्या फलंदाजांना अधिक धावा करता आल्या नाही.

चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाच्या अभिषेक शर्माने १२ चेंडूत ३७ धावा करत तुफानी सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये ७८ धावा करत चेन्नईवर दबाव कायम ठेवला. मारक्रमने अर्धशतकी खेळी करत विजयाचा मार्ग दाखवला. हैदराबाद संघाने ६ गडी गमावून ११ चेंडू बाकी असताना सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT