IPL 2024 Points table update after csk vs pbks match amd2000 twitter
क्रीडा

IPL 2024 Points Table: चेन्नईला नमवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप!या संघांचं टेन्शन वाढलं

IPL Points Table Latest Update: आयपीएल २०२४ स्पर्धेत बुधवारी (१ मे) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत बुधवारी (१ मे) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा सामना पंजाबने ७ गडी राखून आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ गडी बाद १६२ धावा केल्या. पंजाबने या आव्हानाचा पाठलाग करताना शानदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला.

या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे पंजाबच्या खेळाडूंनी अधिकचा जोर लावला. चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ आठव्या स्थानी होता. आता पंजाबचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे. पंजाबला आतापर्यंत ४ सामने जिंकता आले आहेत. तर पराभूत होणारा चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी कायम आहे.

टॉप ४ मध्ये या संघांचा समावेश..

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ प्रत्येकी १२-१२ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर चेन्नईचा संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ प्रत्येकी १०-१० गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. तर पंजाबचा संघ सातव्या आणि गुजरातचा संघ आठव्या स्थानी आहे. शेवटी मुंबई इंडियन्सचा संघ नवव्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT