IPl 2024 PBKS vs DC  Saam Tv
Sports

PBKS vs DC : सॅम कुरनच्या दमदार खेळीने पंजाबचा विजय, 4 गडी राखत दिल्ली संघाला नमवलं

IPl 2024 PBKS vs DC : दिल्लीच्या संघाने दिलेल्या १७५ धावांचे आव्हान पाठलाग करताना पंजाबच्या किंग्सने ४ विकेट राखत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ विकेट गमावावून १७४ धावा केल्या होत्या.

Bharat Jadhav

IPL 2024 PBKS vs DC Punjab win :

आयपीएल १७ व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. एकतर्फी वाटणाऱ्या सामन्याने क्रिकेट चाहत्यांची धकधक वाढवली होती. अखेरच्या षटकात ६ धावा लागत असताना लियाम लिव्हिंगस्टोनने षटकार लगावत पंजाबला विजय मिळवून दिला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सच्या संघाने मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विजयाचा श्रीगणेशा केला.(Latest News)

पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ विकेट गमावावून १७४ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेलने १० चेंडूत ३२ धावा केल्या. पोरेल हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्याने २० व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर २५ धावा ठोकल्या. त्यानंतर दिल्लीकडून होपने ३३, डेव्हिड वॉर्नरने २९, अक्षर पटेलने २१ धावा केल्या. दरम्यान १५ महिन्यानंतर मैदानावर परतणाऱ्या ऋषभ पंतने १८ धावा केल्या. गोलंदाजीत पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंगने २-२ बळी घेतले.

दिल्लीच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने दमदार सुरुवात केली. जास्त विकेट न गमावता दिल्लीच्या संघाला मात दिली. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करण्यात ऑलराउंडर सॅम कुरन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी सिंहाचा वाटा उचलला. सॅम कुरनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने ३९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कुरनने ४७ चेंडू ६३ धावा केल्या. तर लिव्हिंगस्टोन नाबाद राहिला.

लिव्हिंगस्टोनने शेवटच्या षटकात सुमित कुमारच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंहने २६ आणि कर्णधार शिखर धवनने २२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टो आणि जितेश शर्मा ९-९ धावा करून बाद झाले. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमदने शानदार गोलंदाजी केली. खलीलने १९व्या षटकात दोन चेंडूंत दोन बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

SCROLL FOR NEXT