आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ४५४ दिवसांनंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे.
कार अपघात झाल्यानंतर रिषभ पंतला गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दुर राहावं लागलं. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून, तो मैदानावर फलंदाजी करण्यासाठी उतरला. तो फलंदाजीला येत असल्याचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून आक्रमक फलंदाजी करत ३९ धावा चोपल्या. दरम्यान मिचेल मार्श २० आणि डेव्हिड वॉर्नर २९ धावांवर बाद होऊन परतल्यानंतर रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला.
मैदानात आल्यानंतर तो भावूक झाल्याचं दिसून आलं. ४५४ दिवसांनंतर कमबॅक करत असलेल्या रिषभ पंतला क्रिकेट फॅन्सनेही स्टँडिंग ओव्हेशन दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कमबॅक सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळाली, मात्र सुरुवातीचं रुपांतर मोठ्या खेळीत करु शकला नाही. तो १३ चेंडूत १८ धावा करत माघारी परतला. यादरम्यान त्याने २ चौकार मारले. (Cricket news in marathi)
या सामन्यासाठी अशी आहे दिल्ली कॅपिटल्स संघाची प्लेइंग ११:
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.