ipl 2024 Mustafizur Rahman picked 4 wickets against rcb in his comeback match after injury  twitter
Sports

RCB vs CSK: ४ दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला अन् पहिल्याच सामन्यात CSK साठी 'मॅन ऑफ द मॅच' ठरला

Mustafizur Rahman Bowling: आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजयी सलामी दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे

Ankush Dhavre

CSK vs RCB, Mustafizur Rahman :

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजयी सलामी दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात १७४ धावांचा पाठलाग करताना रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेने महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने विजयाचा पाया रचला. दुखापतीतून उठून आलेल्या मुस्तफिजुर रहमानने पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घातला आहे.

मुस्तफिजुर रहमान हा चेन्नईच्या विजयाचा खरा हिरो ठरला आहे. त्याने या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. ही शानदार कामगिरी त्याने दुखापतीतून कमबॅक करताना केली आहे. काही दिवसांपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आलं होतं.

तर झालं असं की,१८ मार्च रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात मुस्तफिजुर रहमान गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याला वेदना होऊ लागल्याने तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर मेडिकल स्टाफ आणि फिजिओ त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर घेऊन गेले. त्यावेळी असं वाटलं होतं की, तो आयपीएल २०२४ स्पर्धा खेळू शकणार नाही. मात्र त्याने शानदार कमबॅक केलं आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. (Cricket news in marathi)

कोहलीला केलं बाद...

या सामन्यातील १२ वं षटक टाकण्यासाठी मुस्तफिजुर रहमान गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने विराट कोहलीला पॅव्हेलियनची वाट दाखवली. कोहली शानदार टचमध्ये असल्याचं दिसून येत होतं. मात्र त्याने विराटला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याला २१ धावांवर बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर याच षटकातील चौथ्या चेंडूवर कॅमरुन ग्रीनच्या यष्ट्या उधळत त्याला माघारी धाडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : हॉटेलमध्ये जाऊन सोबत पिले दारू; बाहेर निघताना झाला वाद, नशेतच चाकूने हल्ला करत केली हत्या

GK: सीमेवर वसलेलं 'हे' आहे भारतातील अंतिम रेल्वे स्थानक

Early symptoms of pancreatic cancer : स्वादुपिंडाचा कॅन्सर होत असताना शरीरात होतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

घरातील 'हा' कोपरा ठेवा रिकामा, होईल अनेक लाभ

Sanjay Shirsat: पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला...; मंत्री शिरसाटांचं नवं विधान; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT