आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेपूर्वीच गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आपल्या जुन्या संघात म्हणजेच मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. हार्दिकनंतर गुजरात टायटन्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला असता.
गुजरात टायटन्स संघाचे सीओओ अरविंदर सिंग (Gujarat Titans COO) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, शमीला एका संघाने ट्रे़डची ऑफर दिली होती. मात्र याबाबत फ्रेचांयजीला कुठलीही कल्पना दिली गेली नव्हती. ही ट्रेडची ऑफर थेट खेळाडूला देण्यात आली.
अरविंदर सिंग (Arvinder Singh) यांचं म्हणंण आहे की, 'आयपीएलने ट्रेडिंगसाठी एक सिस्टम तयार केलं आहे. या सिस्टमनुसार तुम्ही थेट जाऊन खेळाडूला ऑफर देऊ शकत नाही. त्यामुळे गैरव्यवस्थापन होईल.' त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जे होईल नियमातच होईल. त्यांनी जर आमच्याशी योग्य मार्गाने संपर्क साधला असता तर आम्ही नक्कीच चर्चा करुन आमचा निर्णय कळवला असता. मात्र इथे चुकीच्या मार्गाचा अवलंब केला गेला आहे. (Latest sports updates)
मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला गोलंदाज आहे. त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले होते. तसेच आयपीएल २०२३ स्पर्धेतही त्याने सर्वाधिक गडी बाद करत पर्पल कॅप पटकावली होती. त्यामुळे त्याची डिमांड वाढली आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ टी -२०,३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. वनडे आणि टी-२० मालिकेत मोहम्मद शमीला विश्रांती दिली गेली आहे. तर कसोटी मालिकेसाठी शमीला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र पुर्णपणे फिट नसल्याने तो कसोटी मालिकेत खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.