IPL 2024 MI vs RR Playing XI Prediction Mumbai Indians vs Rajasthan Royals Playing 11 News in marathi twitter
Sports

MI vs RR, Playing XI: सूर्याचं कमबॅक होणार? राजस्थानविरुद्धच्या लढतीत हार्दिक या ११ खेळाडूंना देणार स्थान

Mumbai Indians vs Rajasthan Royals, Playing 11 Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत

Ankush Dhavre

MI vs RR, Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. सलग २ सामने गाजवणारा मुंबई इंडियन्सचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये होणार बदल?

या सामन्यात मुंबई इंडियन्स शम्स मुलानी आणि क्वेना मफाकाला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मफाका महगडा ठरला होता. त्याने ४ षटकात गोलंदाजी करताना १६.५ च्या इकोनॉमीने ६६ धावा खर्च केल्या होत्या. त्याच्याऐवजी आकाश मधवालला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. आकाशने गतवर्षी झालेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. (Cricket news in marathi)

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११-

मुंबई इंडियन्स -

ईशान किशन (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्ज़ी, रोमारियो शेफर्ड, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

इम्पॅक्ट प्लेअर: आकाश मधवाल.

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, आर अश्विन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान.

इम्पॅक्ट प्लेअर- नांद्रे बर्गर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT