ipl 2024 lungi ngidi ruled out due to injury Jake Fraser Mcgurk named as replacement delhi capitals saam tv news
Sports

IPL 2024: दिल्लीला मोठा धक्का! प्रमुख खेळाडूची स्पर्धेतून माघार; रिप्लेसमेंट म्हणून BBL गाजवणाऱ्या खेळाडूला स्थान

Lungi Ngidi Replacement: आयपीएलच्या १७ व्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

Jake Fraser Mcgurk Replaced Lungi Ngidi:

आयपीएलच्या (IPL 2024) १७ व्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने सर्वच संघांनी कसुन सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

दिल्लीच्या ताफ्यात घातक गोलंदाजाची एन्ट्री..

आयपीएल २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाची ताकद आणखी वाढली आहे. संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एन्गिडी (lungi Ngidi) दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून जेक फ्रेझर-मॅकगर्कला (Jake Fraser Mcgurk) संघात स्थान दिलं गेलं आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क हा अष्टपैलू खेळाडू असून तो आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. लुंगी एन्गिडी गेल्याने नक्कीच दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला आहे. कारण तो सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली आहे. (Lungi Ngidi Replacement)

जेक फ्रेझर-मॅकगर्कने नुकताच झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत तुफान कामगिरी केली होती. त्यामुळे रिकी पॉटिंगने त्याला या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. लुंगी एन्गिडी दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. लुंगी एन्गिडी बाहेर झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर-मॅकगर्कला ५० लाखांची किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे. (Cricket news in marathi)

काही दिवसांपूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघासाठी गुड न्यूज आणि बॅड न्यूज समोर आली आहे. गेल्या संपूर्ण हंगामातून बाहेर राहिलेला रिषभ पंत आगामी हंगामात खेळताना दिसून येणार आहे. तर संघातील आक्रमक फलंदाज हॅरी ब्रुकने संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माघार घेत असल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT