WPL 2024 Playoffs: मुंबई पुन्हा फायनल गाठणार की आरसीबी १६ वर्षांचा दुष्काळ संपवणार? वाचा कोणाचं पारडं जड

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Head To Head: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
WPL Playoffs 2024 mumbai indians vs royal challengers bangalore head to head match details cricket news in marathi
WPL Playoffs 2024 mumbai indians vs royal challengers bangalore head to head match details cricket news in marathitwitter
Published On

Women's Premier League Playoffs:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने शानदार कामगिरी करत ६ सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमधून जो संघ विजयी होईल तो थेट अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करताना दिसून येणार आहे. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. त्यामुळे हा सामना देखील रोमांचक होऊ शकतो.

मुंबई विरुद्ध बंगळुरू...

स्म्रिती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गेल्या हंगामात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र या हंगामात या संघाने दमदार खेळ करून दाखवला आणि स्पर्धेतील बाद फेरीत प्रवेश केला. एलिमिनेटरचा सामना १५ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून बंगळुरूचा संघ फायनलचं तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Cricket news in marathi)

WPL Playoffs 2024 mumbai indians vs royal challengers bangalore head to head match details cricket news in marathi
IND vs ENG Test Series: भारतात इंग्लंडचा दारुण पराभव का झाला? माजी खेळाडूने सांगितलं कारण

मुंबईचा पराभव...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं समीकरण तळ्यात मळ्यात होतं. मात्र अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने गोलंदाजीत धमाल केल्यानंतर फलंदाजीत धुरळा उडवत मुंबईला पराभूत केलं.

या सामन्यात गोलंदाजी करताना तिने सर्वाधिक ६ गडी बाद केले. जी या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तिच्या या घातक गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज टिकू शकले नाही. मुंबईचा संपूर्ण डाव ११३ धावांवर आटोपला. या आव्हानाचा पाठलाग करताना एलिस पेरीने ३८ चेंडूत ४० धावांची खेळी केली. तिने ऋचा घोषसह ७६ धावांची भागीदारी करत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. यासह प्लेऑफचं तिकीट देखील मिळवून दिलं.

WPL Playoffs 2024 mumbai indians vs royal challengers bangalore head to head match details cricket news in marathi
WPL 2024: ७ चौकार अन् ५ षटकार! शेफालीच्या वादळी खेळीच्या बळावर दिल्लीचा सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश

असे आहेत दोन्ही संघ:

मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो टायरन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, हुमेरा काजी, इसाबेल वोंग, जिन्तिमनी कलिता, नताली साइवर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, प्रियंका बाला, साइका इशाक, यस्तिका भाटिया, शबनीम इस्माइल, सजीवन सजना, अमनदीप कौर, फातिमा जाफर आणि किर्तन बालाकृष्णन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: स्म्रिती मंधाना (कर्णधार), आशा शोभना जॉय, दिशा कसाट, एलिस पेरी, नादिन डी क्लर्क, इंद्राणी रॉय, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग, ऋचा घोष, श्रेयंका पाटील, सोफी डिवाइन, जॉर्जिया वेयरहम, एकता बिष्ट, केट क्रॉस , शुभा सतीश, सब्बिनेनी मेघना, सिमरन बहादुर आणि सोफी मोलिनेक्स.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com