ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवळा हे एक सुपरफूड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या डिशेससाठी आवळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आवळ्यापासून तुम्ही झणझणीत ठेचा देखील बनवू शकता.
आवळा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि लसणाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.
आवळ्यांचे छोटे तुकडे करुन कापून घ्या आणि आवळ्यातील बी टाकून द्या. तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण या साहित्यांना धुवून घ्या आणि कापा.
एका पॅनमध्ये जीरे टाकून हलकेसे भाजून घ्या, मग त्यांत कापलेला आवळा आणि हिरवी मिरची टाका.
आवळा शिजून थोडा बारीक मऊ झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून शिजवून घ्या.
तयार केलेल मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात थोडे मीठ टाका.
स्वादिष्ट आणि झणझणीत आवळा ठेचा तयार आहे. ठेच्याला तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत खाऊ शकता.
आवळा ठेचा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मजबूत इम्यूनिटी आणि पचनक्रियेसाठी चांगले मानले जाते.