ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हॉट चॉकलेट हे लोकप्रिय पेय आहे. खासकरुन, लहान मुलांना भरपूर आवडते. तुम्ही घरच्या घरी लहान मुलांसाठी सोप्या पध्दतीने हॉट चॉकलेट बनवू शकता.
हॉट चॉकलेट बनवण्यासाठी दूध, कोको पावडर, साखर, चॉकलेट चिप्स आणि व्हॅनीला एसेंस इत्यादी साहित्य लागते.
सगळ्यात आधी मध्यम आचेवर दूध गरम करुन घ्या. उकळ आल्यानंतर गॅस बंद करा.
कोको पावडर आणि साखरेला गरम दूधात टाका आणि हळू हळू मिक्स करा. सोबतच चॉकलेट चिप्स देखील टाका.
आता त्यात व्हॅनीला एसेंस टाका आणि मंद आचेवर उकळून घ्या. असे केल्यास चव अधिक टेस्टी लागेल.
तयार झालेल्या हॉट चॉकलेटला मार्शमॅलो किंवा क्रिम सोबत गार्निश करा आणि गरमा गरम सर्व्ह करा.
अतिरिक्त चवीसाठी तुम्ही दालचिनी किंवा जायफळ घालू शकता.
हे पेय केवळ स्वादिष्टच नाही तर शरीराला उबदारपणा देते आणि थंडीपासून आराम देते.