ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरी बनवलेले स्नॅक्स सगळ्यांनाच भरपूर आवडतात. घरगुती स्नॅक्स हे चहा सोबत खायला अप्रतिम लागतात. तसेच मसाला शेंगदाणे हा प्रकार देखील स्नॅक्स मधील एक आहे.
बाजारात मिळणारी मसाला शेंगदाणे जवळपास सगळ्यांनाच आवडते. मसाला शेंगदाणे तुम्ही घरच्या घरी सोप्या पध्दतीने बनवू शकता जाणून घ्या रेसिपी.
शेंगदाण्याचे दाणे, बेसन, हळद, मीठ, हिंग , धणे पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि राईचे तेल इत्यादी साहित्य लागते.
शेंगदाण्याचे दाणे पाण्यात चांगले धुवा आणि नंतर त्यातील पाणी काढून टाका. आता, शेंगदाणे एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि त्यावर बेसन शिंपडा.
सर्व शेंगदाण्यांना पुरेल एवढेच बेसन घाला. आता, चवीनुसार सर्व मसाले घाला.
सगळे मसाले शेंगदाण्यांना चांगले चिकटले पाहिजेत म्हणून त्यावर पाणी शिंपडा.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात मसाला लावलेले शेंगदाणे मंद आचेवर तळून घ्या. यामुळे ते चांगले शिजले जातील.
तळलेले मसाला शेंगदाणे टिशू पेपरवर टाका आणि थंड होण्यास ठेवून द्या जेणेकरुन कुरकुरीतपणा येईल. आता तुम्ही हे मसालेदार शेंगदाणे चहासोबत खाऊ शकता.