आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले. चेपॉकच्या मैदानावर झालेल्या या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली आणि कोलकाता नाईट रायडर्स संघावर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हा पहिलाच पराभव ठरला. दरम्यान या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा या हंगामातील तिसरा विजय ठरला आहे. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत ६ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर सलग ३ सामने जिंकून चौथा सामना गमावणारा कोलकता नाईट रायडर्सचा संघ ६ गुणांसह नेट रनरेटच्या बळावर दुसऱ्या स्थानी आहे. (IPL 2024 News in Marathi)
या स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा राजस्थान रॉयल्सचा संघ ८ गुणांसह +१.१२० नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. तर ४ पैकी ३ सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. यासह ६ गुण आणि +०.७७५ नेट रनरेट असलेला लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. आता चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे.
इतर संघांबद्दल बोलायचं झालं, तर सनरायझर्स हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आहे. पंजाब किंग्जचा संघ सहाव्या स्थानी आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. या तीनही संघाचे प्रत्येकी ४-४ गुण आहेत. तर केवळ १ सामना जिंकू शकलेला मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नवव्या स्थानी आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ सर्वात शेवटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.