IPL 2024 latest points table standing after pbks vs rr match Punjab kings vs Rajasthan royals amd2000 twitter
Sports

IPL Points Table Update: पंजाब - राजस्थान सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

IPL Latest Points Table Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा सामना जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या स्थानी कायम आहे. या सामन्यापूर्वी देखील राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या स्थानी कायम होता. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ५ सामने जिंकता आले आहेत. यासह राजस्थान रॉयल्सचा गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानी आहे. या संघाने ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

टॉप ४ मध्ये कोणते संघ?

तसेच गुणतालिकेतील टॉप ४ संघांबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दुसऱ्या स्थानी, चेन्नई सुपर किंग्जचा संघ तिसऱ्या स्थानी आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ चौथ्या स्थानी आहे.

तर उर्वरित संघांबद्दल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आणि गुजरात टायटन्सचा संघ सहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येकी ६-६ गुण आहेत. हैदराबादने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सने देखील ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानी, पंजाब किंग्जचा संघ आठव्या स्थानी आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवव्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT