ipl 2024 equation for chennai super kings and royal challengers bengaluru to qualify in ipl playoffs amd2000 twitter
क्रीडा

IPL 2024 Playoffs Scenario: समीकरण ठरलं! RCB अन् CSK ला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?

Ankush Dhavre

चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्स संघाला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला एकाच दिवशी पराभूत केलं आहे. या दोन्ही संघांमध्ये प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे. हे दोन्ही संघ १८ मे रोजी आमने सामने येणार आहेत. ही लढत दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत असणार आहे. दरम्यान आता दोन्ही संघांसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण समोर आलं आहे.

समीकरण जाणून घेण्यापूर्वी या हंगामातील दोन्ही संघांच्या या हंगामातील कामगिरीवर नजर टाकूया. या संघाने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. यापैकी ७ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. १४ गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं,तर या संघाने १३ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. नेट रनरेट चांगला असल्याने हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

करो या मरो लढत

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील निर्णायक सामना १८ मे रोजी होणार आहे. हा सामना जर चेन्नईने जिंकला, तर चेन्नईचा संघ १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी फक्त सामना जिंकणं पुरेसं नसेल. कारण दोन्ही संघाचे गुण बरोबर झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाला नेट रनरेटमध्ये मागे सोडावं लागेल.

कसं असेल समीकरण?

जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये जायचं असेल, तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. तर दुसरी अट म्हणजे या संघाला १८ किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला २०० पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील. जर चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर चेन्नईला कमीत कमी धावांवर रोखून हा सामना १८ किंवा त्यापेक्षा कमी षटकात जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. आरसीबीने हा सामना १७ धावांनी जिंकला तरीदेखील चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT