IPL 2024 CSK vs DC Playing XI Chennai Super kings vs delhi capitals playing xi prediction news in marathi yandex
Sports

CSK vs DC, IPL 2024: गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

CSK vs DC, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज सुपर संडेचे सामने पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

CSK vs DC, IPL 2024 Playing 11 Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज सुपर संडेचे सामने पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता विशाखापट्टनममध्ये रंगणार आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणार आहे.

तर चेन्नईचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चेन्नईने गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केलं आहे. तर दुसरीकडे दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जकडून पराभूत होऊन आला आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या. अशी असेल चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग ११..

या सामन्यात चेन्नईचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चेन्नईकडून ऋतुराज आणि रचिन रविंद्रची जोडी मैदानावर येऊ शकते. तर अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरील मिशेलसारखे फलंदाज मध्यक्रमात खेळताना दिसून येऊ शकतात. तर रविंद्र जडेजा, एमएस धोनी आणि समीर रिजवी यांच्यावर शेवटी फलंदाजी करण्याची संधी असणार आहे.

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, शिवम दुबे, रविंद्र जड़ेजा, समीर रिजवी, एमएस धोनी, दीपक चाहर, महेश थिक्षणा आणि तुषार देशपांडे. (Cricket news in marathi)

तर दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. त्यानंतर रिषभ पंत, स्टब्स आणि ललित यादवसारखे फलंदाज मध्यक्रमात धावा करताना दिसून येऊ शकतात.

अशी असू शकते प्लेइंग ११:

डेव्हिड वार्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टियन स्टब्स, ललित यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मुकेश कुमार आणि एर्निक नॉर्खिया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT