ipl playoffs
ipl playoffs  saam tv
क्रीडा | IPL

IPL 2023 Points Table: गुजरातचा Playoff मध्ये प्रवेश! अजूनही ७ संघांना संधी; पाहा काय आहे समीकरण

Ankush Dhavre

IPL 2023 : आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने जोरदार कामगिरी करत २४ धावांनी विजय मिळवला.

या विजयासह गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. तर पराभूत झालेला सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहचताच काही संघांची चिंता वाढली आहे. काय आहे उर्वरित संघांसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

लखनऊ चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी..

चेन्नई सुपर किंग्ज संघ १३ पैकी ७ सामने जिंकून १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नईचा एक सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. येणाऱ्या सामन्यात जर चेन्नईने विजय मिळवला तर चेन्नईचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म होऊ शकतं.

तर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडे दुसऱ्या स्थानी जाण्याची सुवर्णसंधी आहे. असे झाल्यास चेन्नई सुपर किंग्ज संघाला क्वालीफायर ऐवजी एलिमिनेटरचा सामना खेळावा लागू शकतो.

तर मुंबई इंडीयन इंडियन्सचा संघ १२ सामन्यांमध्ये १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. जर आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला, तर मुंबईचा संघ थेट दुसऱ्या स्थानी विराजमान होणार आहे. जर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपला पुढचा सामना गमावला तर चेन्नईचं दुसऱ्या स्थानी पोहोचणं कठीण होऊन जाईल.

लखनऊचा संघ १२ पैकी ६ सामने जिंकून १३ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. लखनऊचे २ सामने मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रंगणार आहे.

या २ पैकी लखनऊने एकही सामना जिंकला तर राजस्थान रॉयल्स संघ अंतिम सामना जिंकूनही स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. राजस्थान रॉयल्स संघाचं भवितव्य आता लखनऊ सुपर जायंट्स संघावर अवलंबून आहे. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं समीकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये प्लेऑफमध्ये जाण्याची लढत सुरू आहे. हे संघ १६ अंकांपर्यंत पोहचू शकतात. हे संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

त्यामुळे आता समीकरण जुळताना दिसून येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघाचे प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचे १३-१३ सामने झाले आहेत.

तसं पाहायला गेलं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT