Rohit Sharma News Saam TV
Sports

IPL 2023 News : रोहित शर्मा कुठंय? IPL च्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोमुळे सगळ्यांनाच धक्का, MI खेळणार की नाही?

Rohit Sharma News : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या फोटो सेशनमध्ये दिसत नाहीये.

प्रविण वाकचौरे

IPL 2023 News : इंडियन प्रीमियर लीगच्या 16वा सीजन उद्यापासून सुरु होत आहे. सर्वच क्रिकट प्रेमी क्रिकेटच्या या उत्सवासाठी सज्ज आहेत. दहाच्या दहा टीम देखील आयपीएल चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी कसून सराव करत आहेत. त्याआधी आयपीएल ट्रॉफीसोबत संघांच्या कर्णधारांचं फोटोसेशन पार पडलं.

मात्र हे फोटो सेशन पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. कारण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या फोटो सेशनमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे रोहित कुठेय? असा प्रश्न आता सगळे विचारत आहेत.

रोहित नेमका कुठे आहे? रोहितला काही दुखापत झाली आहे का? की रोहित कुठे बाहेर आहे? असे अनेक प्रश्न आता क्रिकेट रसिकांना, मुंबई इंडियन्स फॅन्सना आणि रोहित शर्माच्या फॅन्सना पडले आहेत.

मात्र आयपीएल व्यवस्थापनाने केलेल्या या फोटो सेशनमध्ये केवळ 9 संघांचेच कर्णधार दिसत आहेत. रोहित शर्मा काही कारणाने येथे येऊ शकला नसेल, तर मुंबई इंडियन्सकडून एखादा दुसरा खेळाडू देखील पाठवता आला असता, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

आयपीएलच्या या फोटोवर युजर्स कमेंट करुन रोहित शर्मा कुठे आहे असं विचारत आहे. तर एका युजरने थेट म्हटलं की, रोहित शर्मा ट्रॉफी घ्यायला येईल. मुंबई इंडियन्स यावर्षी आयपीएल खेळणार नाही, असं देखील युजर्स विचारत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स किंवा रोहित शर्माकडून काय प्रतिक्रिया येते यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

Health Tips: माशासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update: असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT