IPL 2023: राशिदच्या फिरकीला ऋतुराज देणार का आव्हान? ओपनिंग सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा!

Player Battle In CSK VS GT Match: पहिल्याच सामन्यात कोणते असे खेळाडू आहेत जे महत्वाची भूमिका बजावू शकतात, चला पाहूया.
CSK VS GT
CSK VS GTSaam Tv

Players To Watch Out In CSK vs GT Match: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

स्पर्धेतील पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

पहिल्याच सामन्यात कोणते असे खेळाडू आहेत जे महत्वाची भूमिका बजावू शकतात, चला पाहूया.

CSK VS GT
Highest Earning Players in IPL: आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत रोहितच 'दादा', रक्कम ऐकून म्हणाल बाबो!

ऋतुराज गायकवाड:

चेन्नई सुपर किंग्ज संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. गतवर्षी त्याने हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र आगामी हंगामात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

बेन स्टोक्स:

चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला १६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. असे म्हटले जात आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बेन स्टोक्सला संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. त्याने गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोरदार खेळी करत इंग्लंड संघाला जेतेपद मिळवून दिले होते. आता चेन्नई सुपर किंग्ज संघालाही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Latest sports updates)

CSK VS GT
IPL 2023: गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात‘हे’५ फलंदाज, स्ट्राईक रेटच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडतात मागे

हार्दिक पंड्या:

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. हीच कामगिरी पाहता त्याला भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद दिले गेले होते. भारतीय संघासाठी देखील त्याने चांगली कामगिरी केली होती. आता तो पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

राशिद खान:

टी -२० क्रिकेटचा अव्वल स्थानी असलेला गोलंदाज राशिद खान देखील सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. नुकताच पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. आता तो आगामी हंगामात फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळात अडकवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रवींद्र जडेजा:

दुखापतीतून पुनरागमन करत असलेल्या रवींद्र जडेजाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत एकच नंबर कामगिरी केली होती. गोलंदाजीसह त्याने फलंदाजीतही मोलाचे योगदान दिले होते. त्यांनतर वनडे मालिकेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. आता आगामी आयपीएल हंगामात देखील त्याला अशीच कामगिरी करावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com