Highest Earning Players in IPL: आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत रोहितच 'दादा', रक्कम ऐकून म्हणाल बाबो!

Chandrakant Jagtap

इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम उद्यापासून म्हणजेच 31 मार्चपासून सुरू होत आहे.

IPL | Twitter

आयपीएलमध्ये 2008 पासून फक्त मानधनातून 150 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 3 खेळाडू आहेत.

IPL | Twitter

विशेष म्हणजे ही तिन्ही नावं भारतीय आहेत. यात पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचं नाव आहे.

Rohit Sharma | Twitter

रोहितने आयपीएलमधून 178 कोटी रुपये कमावले आहे. 2008 मध्ये 3 कोटी घेतलेल्या रोहितचं सध्याचं मानधन 16 कोटी रुपये आहे.

Rohit Sharma | Twitter

आयपीएलच्या पहिल्या सत्रात धोनी सर्वात महागडा खेळाडू होता. पहिल्या हंगामात धोनीचं मानधन 6 कोटी रुपये होतं, ते सध्या 12 कोटी रुपये आहे.

MS Dhoni | Twitter

आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने आतापर्यंत सुमारे 176 कोटी रुपये कमावले आहेत.

MS Dhoni | Twitter

विराट कोहली आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमधून 173 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

Virat Kohli | Twitter

याशिवाय मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमधून 110 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

Suresh Raina | Twitter

आयपीएलमधील कमाईच्या बाबतीत रवींद्र जडेजाही मागे नाही, त्याने आयपीएलमधून आतापर्यंत 109 कोटी मानधन घेतले आहे.

ravindra jadeja | Twitter

NEXT : मृणालच्या सौंदर्याचा स्वॅगचं निराळा! फोटो पाहून चाहते पडले प्रेमात

Mrunal Thakur | Saamtv