IPL 2023: गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात‘हे’५ फलंदाज, स्ट्राईक रेटच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडतात मागे

Highest Strike Rate In IPL : कोण आहेत सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणारे फलंदाज? चला पाहूया.
Highest Strike Rate
Highest Strike RateSaam Tv
Published on

Top 5 Batsman With Highest Strike Rate In IPL: जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आयपीएल स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक मोठ मोठे विक्रम पाहायला मिळत असतात.

या स्पर्धेत फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असतात. दरम्यान कोण आहेत सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणारे फलंदाज? चला पाहूया.

IPL season 2023
IPL season 2023SAAM TV

१) आंद्रे रसल:

वेस्ट इंडिज संघातील अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे.

जेव्हा हा फलंदाज फॉर्ममध्ये असतो त्यावेळी गोलंदाज कुठलाही असो चेंडू स्टेडियमच्या बाहेरच जात असतो. आंद्रे रसलने आतापर्यंत या स्पर्धेतील ९८ सामन्यांमध्ये १७७.८८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. (Latest Sports Updates)

Andre Russell 6 Balls 6 Sixes
Andre Russell 6 Balls 6 SixesSaam TV
Highest Strike Rate
Highest Earning Players in IPL: आयपीएलमधून कमाईच्या बाबतीत रोहितच 'दादा', रक्कम ऐकून म्हणाल बाबो!

२)लियाम लिविंगस्टन :

लियाम लिविंगस्टन हा एकट्याच्या जीवावर सामना जिंकून देणारा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद धावा करण्याच्या बाबतीत हा फलंदाज दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २३ सामन्यांमध्ये १६६.८७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Liam Livingstone
Liam Livingstone Twitter/ @ECB
Highest Strike Rate
Suryakumar Yadav In IPL 2023 : सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मधून बाहेर? प्रशिक्षकाच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

३)सुनील नरेन:

आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सुनील नरेन हा आक्रमक फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्याने १४८ सामन्यांमध्ये १६२.७० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

sunil narine
sunil narinetwitter

४) वीरेंद्र सेहवाग:

भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या तारबाडतोड फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याने आयपीएल स्पर्धेला राम राम केला असला तरीदेखील सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश आहे. त्याने १०४ सामन्यांमध्ये १५५.४४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

virender sehwag
virender sehwagsaam tv

५) ख्रिस मॉरिस:

ख्रिस मॉरिस हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. आपल्या वेगवान गोलंदाजीसह तो आक्रमक फलंदाजीने देखील चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. त्याने आयपीएल स्पर्धेतील ८१ सामन्यांमध्ये १५५.२८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

chris morris
chris morrisTwitter/RCB

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com