IPL 2023, DC vs SRH IPL twitter
Sports

IPL 2023, DC vs SRH: सुंदर, भुवनेश्वरचा भेदक मारा, हैदराबादने दिल्लीला 144 धावांवर रोखलं

IPL 2023, DC vs SRH: पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023, DC vs SRH: आयपीएलच्या 34 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या.

दिल्ली संघात आज अनेक बदल करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा फायदा झालेलं दिसलं नाही. पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले. मात्र, त्याच्या जागी संघात घेतलेल्या खेळाडूंनाही फार काही करता आले नाही.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वरने फिलिप सॉल्टला बाद केले. सॉल्ट शून्यावर बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून मनीष पांडेने 27 चेंडूत 34 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 34 चेंडूत 34 धावांची खेळी केली. ( sports updates)

मिचेल मार्शने 15 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. सनरायझर्स हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या. टी. नटराजनला एक विकेट मिळाली. दिल्ली कॅपिटल्सचे 3 फलंदाज रनआऊट झाले. (Latest sports updates)

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाच दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या 5 सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या सामन्यात दिल्लीने विजयाचं खातं उघडलं. सध्या चेन्नई सुपर किंग्ज 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.हैदराबाद आणि दिल्ली अनुक्रमे 9 आणि 10व्या स्थानवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT