Interesting facts about odi cricket world cup in marathi icc odi world cup 2023  Saam tv news
क्रीडा

World Cup 2023: क्रिकेटचे कट्टर समर्थक असाल, तर World Cup चे हे Interesting Facts माहित असायलाच हवे

Ankush Dhavre

Interesting World Cup Facts:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.

वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात छोटा सामना..

इंग्लंड आणि कॅनडा हे दोन्ही संघ १९७९ वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी आमने सामने आले होते. या स्पर्धेत कॅनडाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. या सामन्यात कॅनडाचा डाव अवघ्या ४५ धावांवर संपुष्टात आला होता. हे आव्हान इंग्लंडने ८.३ षटकात पूर्ण केले होते.

पहिली हॅट्रीक...

वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिली हॅट्रीक घेण्याचा रेकॉर्ड हा माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या नावावर आहे. १९८७ वर्ल्डकप स्पर्धेत त्यांनी न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात हा कारनामा केला होता.

सर्वात छोटी धावसंख्या..

वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात छोटी धावसंख्या ३६ धावा इतकी आहे. हा कारनामा २००३ वर्ल्डकप स्पर्धेत कॅनडा विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला होता.

वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप..

वर्ल्डकप स्पर्धेत कुठल्याही विकेटसाठी केलेली सर्वात मोठी पार्टनरशिप ही ३७२ धावांची आहे. २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत वेस्टइंडीज विरूद्ध झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात ख्रिस गेल आणि मार्लोन सॅम्यूयल्स या दोघांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करत ही ऐतिहासिक पार्टनरशिप केली होती. (Latest sports updates)

लसिथ मलिंगाची हॅट्रीक..

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात सुरूवातीच्या ३ चेंडूंवर हॅट्रीक पू्र्ण केली होती. हा कारनामा त्याने २००७ वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान केला होता.

झिम्बाब्वेने जिंकला पहिला सामना..

ऑस्ट्रेलियाचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. मात्र १९८३ वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT