Champions Trophy Saam tv
Sports

Champions Trophy : पाकिस्तानकडून ब्लंडर! ऑस्ट्रेलिया-इंग्लंडदरम्यान वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, VIDEO

england vs australia news : चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्याआधी भारताचं राष्ट्रगीत लावण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर चूक समजल्यानंतर भारताचं राष्ट्रगीत बंद करून ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत सुरु करण्यात आलं.

Vishal Gangurde

AUS vs ENG, Champions Trophy 2025 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लोहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ब्लंडर झालं. चक्क भारताचे राष्ट्रगीत पाकिस्तानमध्ये वाजले, त्यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित प्रेक्षक हैराण झाले आणि एकच खळबळ उडाली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहेत.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू फेकण्याआधी राष्ट्रगीत होतं. पण त्याचवेळी पाकिस्तानकडून मोठी चूक झाली. स्टेडियमच्या भल्या मोठ्या स्पीकरवर 'जन गण मन...' वाजलं. त्यानंतर स्टेडियममध्ये एकाच खळबळ उडाली.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्याआधी स्टेडियममध्ये एक मोठा ब्लंडर झाल्याचं पाहायला मिळालं. सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानात आल्या. त्यावेळी स्टेडियमवर भारताचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. यावेळी मैदानात 'जन-गण-मन' वाजवण्यात आलं. त्यानंतर स्टेडियमवर मोठाच गोंधळ उडाला.

पाकिस्तान क्रिकेट मॅनेजमेंटकडून ही घोडचूक ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताआधी झाली. इंग्लंडचं राष्ट्रगीत व्यवस्थित वाजवण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी भारताचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. त्यामुळे चूक समजताच भारताचं राष्ट्रगीत बंद करण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं.

पाकिस्तानकडून मोठी घोडचूक झाल्याचं बोललं जात आहे. टीम इंडियाची कोणताही सामना पाकिस्तानात होणार नाही. स्पर्धा सुरु होण्याआधी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी नकार दिला. त्यानंतर भारताने दुबईमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानात भारताचा कोणताही सामना होणार नसताना भारताचं राष्ट्रगीत का वाजवण्यात आलं, याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या ब्लंडरनंतर सोशल मीडियावर भारतीयांकडून पीसीबीला ट्रोल केले जात आहे. पीसीबीच्या कार्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुक्रवारी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामनादरम्यान दोनदा मांजर आडवी आल्याने सामना थांबवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak Photos: अभिनेत्री गिरीजा ओकचं नशीब चमकलं, एका रात्रीत बनली 'नॅशनल क्रश'

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरदार धक्का; हजारो कार्यकर्त्यांसह जालन्यातील बडा नेता शिवसेनेत जाणार

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT