team india twitter
क्रीडा

IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

India vs South Africa, Cricket News In Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामन्याचा थरार पार पडला.

Ankush Dhavre

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. भारतीय संघाकडून फलंदाज आणि गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. फलंदाजी करताना शेफाली वर्मा आणि स्म्रिती मंधाना चमकली.

तर गोलंदाजी करताना स्नेह राणा चमकली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने विक्रमी ६०३ धावा केल्या. त्यानंतर स्नेह राणाच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या २६६ धावांवर आटोपला. राणाने ७७ धावा खर्च करत ८ गडी बाद केले.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डावा स्वस्तात आटोपला. ३३७ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघ्या ३७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १० गडी राखून विजय मिळवला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शेफालीने २४ आणि शुभा सतीशने १३ धावांची खेळी केली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं,तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शेफाली वर्माने २०५ धावांची खेळी केली. तर स्म्रिती मंधानाने १४९ धावा केल्या. पहिल्या डावात भारतीय संघाने ६ गडी बाद ६०३ धावा करत धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मेरिजेन कॅपने ७४ धावांची खेळी केली.

तर सुने लुसने ६५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २६६ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघ आघाडीवर होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला फॉलो ऑन देण्यात आला. त्यानंतर भारतीय संघाला जिंकण्यासाठी ३७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १० गडी राखून सोपा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नाशिक मतमोजणी केंद्रावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT