r ashwin on Michael Vaughan google
Sports

R Ashwin: मायकल वॉनच्या या वक्तव्यावर अश्विन भडकला! जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाला, 'मला तर हसू...'

R Ashwin On Michael Vaughan: मायकल वॉनने भारतीय संघावर जोरदार टीका केली होती. दरम्यान आर अश्विनने टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ankush Dhavre

R Ashwin Statement On Michael Vaughan:

भारतीय संघ हा कसोटी क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता.

भारतीय संघाला हा सामना १ डाव आणि ३२ धावांनी गमवावा लागला होता. या सुमार कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंवर टीकेचा वर्षाव केला गेला होता. मायकल वॉनने देखील भारतीय संघावर जोरदार टीका केली होती. दरम्यान आर अश्विनने टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे.

आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की,'मायकल वॉन काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की भारतीय संघ आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करु शकला नाहीये. हे खरं आहे की भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकलेला नाही आणि आम्ही स्वत:ला या खेळातील महाशक्ती असं म्हणतोय. मात्र ही नाण्याची एक बाजू आहे.' (Latest sports updates)

आर अश्विन पुढे म्हणाला की, ' वर्तमानात आमचा संघ परदेशात दमदार कामगिरी करणाऱ्या संघापैकी एक आहे. मायकल वॉनने टीका केल्यानंतर आमच्या देशातील अनेक क्रिकेट एक्सपर्ट म्हणू लागले आहेत की,भारतीय संघ अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. खरं सांगु तर मला यावर हसू आलं.'

अश्विनने उदाहरण देत म्हटले की, 'मानसिक कणखरता आणि मानसिक कौशल्य असलेला संघ कुठल्याही परिस्थितीत कमबॅक करु शकतो. भारतीय संघाने हे टप्प्या टप्प्यावर सिद्ध करुन दाखवलं आहे. होय आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन फायनल गमावल्या आहेत. मी या गोष्टीचा स्वीकार करतो. पण जेव्हा आपण कसोटीबद्दल बोलतो तेव्हा कमबॅक करण्याची शक्यता अधिक असते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT