Mariyappan Thangavelu twitter
क्रीडा

Mariyappan Thangavelu: वडिलांनी सोडलं, आईने मजूरी करुन शिकवलं; आता पोराने जग जिंकलं!

Mariyappan Thangavelu Struggle Story: भारताचा पॅरा अॅथलिट मरियप्पन थेंगावेलुने इतिहास रचला आहे. वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

Ankush Dhavre

आपल्या पाठीवर वडिलांचा हात असेल, तर आपण जग जिंकू शकतो, असं म्हणतात. मात्र पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पॅरा अॅथलिट मरियप्पन थेंगावेलुची स्टोरी जरा वेगळी आहे. वडील होते, मात्र त्यांनी कुटुंबाची साथ सोडली. त्यांनी आपल्या मुलांचा आणि पत्नीचा जराही विचार केला नाही.

पतीने साथ तर सोडली, पण परिस्थितीला पाठ फिरवून कसं चालेल? म्हणून त्याच्या आईने मजूरी करायला सुरुवात केली. पूर्ण दिवस काम केल्यानंतर १०० रुपये मिळवायचे. या १०० रुपयांवर कुटुंबाचा उदर्निवाह व्हायचा.

वयाच्या ५ व्या वर्षी झाला अपघात

मरियप्पन थेंगावेलु जेव्हा अवघ्या ५ वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्यासोबत मोठी घटना घडली होती. या घटनेमुळे त्याचं आयुष्यच बदललं. शाळेत जात असताना एका ड्रायव्हरने दारुच्या नशेत त्याला पायावरुन बस नेली. या घटनेत त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला. या घटनेनंतरही मरियप्पन थेंगावेलुने कधीच स्वत:ला इतरांपेक्षा कमी समजलं नाही. त्याने खेळांमधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

पॅरालिम्पिक स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच खेळाडू

मरियप्पन थेंगावेलुने पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. तो एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने पॅरालिम्पिक स्पर्धेत सलग ३ पदकं जिंकली आहेत. त्याने रियो पॅरालिम्पिक २०१६ स्पर्धेत सुवर्ण पदक, टोकियो २०२० मध्ये रौप्य आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. हा कारनामा त्याने पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात करुन दाखवला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने १.८५ मीटर उंच उडी मारत कांस्यपदकाला गवसणी घातली.

मरियप्पन थेंगावेलुच्या यशात त्याच्या आईंचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याला यशस्वी बनवण्यात त्याच्या आईने प्रचंड मेहनत घेतली. त्याने रियो आणि टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत मिळालेल्या बक्षीसाच्या पैश्यातून आईसाठी जमीन खरेदी केली. शेतीतून त्यांनी चांगला पैसा कमवला. आता त्यांनी हक्काचं घर बांधलंआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT