indian hockey team twitter
Sports

Paris Olympics: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकावर कोरलं नाव; पराभवानंतर स्पेनचे खेळाडू धो-धो रडले

Paris Olympics 2024, Hockey India vs Spain Final News: भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात स्पेनला २-१ ने पराभूत केलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील कांस्यपदकाचा सामना भारत आणि स्पेन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हरमनप्रीतसेनेने स्पेनला २-१ ने नमवून सलग दुसऱ्यांदा कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. हे भारताचं या स्पर्धेतील चौथं कांस्यपदक ठरलं आहे. एकीकडे भारतीय खेळाडू जल्लोष साजरा करत होते. तर स्पेनच्या खेळाडूंना रडू कोसळलं.

फायनलमध्ये जाण्याची संधी हुकल्यानंतर भारतीय संघाने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंकडून आक्रमक खेळ केला. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मात्र एकही गोल झाला नाही.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये उघडलं खातं

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार खेळ केला. स्पेनला दुसऱ्या क्वार्टरमधील तिसऱ्याच मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत स्पेनच्या खेळाडूने पेनल्टी स्ट्रोकमध्ये पहिला गोल केला आणि स्पेनला गोलचं खातं उघडलं. त्यानंतर शेवटच्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचा फायदा घेत हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला १-१ ने कमबॅक करुन दिलं.

भारताने घेतली आघाडी

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला सुरुवातीलाच गोल करण्याची संधी मिळाली. तिसऱ्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली आणि हरमनप्रीत सिंगने या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करत गोल केला आणि २-१ ने आघाडी घेतली.

सलग दुसऱ्यांदा कोरलं कांस्यपदकावर नाव

भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही कांस्यपदकाला गवसणी घातली होती. या सामन्यात भारताने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला होता. हे भारताचं ऑलिम्पिक स्पर्धेतील १३ वे पदक ठरलं आहे.

भारताने हॉकीमध्ये आतापर्यंत जिंकलेली पदकं

८ सुवर्ण पदके:

१९२८ (आम्स्टरडॅम)

१९३२ (लॉस एंजेलिस)

१९३६ (बर्लिन)

१९४८ (लंडन)

१९५२ (हेलसिंकी)

१९५६ (मेलबर्न)

१९६४ (टोकियो)

१९८० (मॉस्को)

१ रौप्य पदक:

१९६० (रोम)

३ कांस्य पदके:

१९६८ (मेक्सिको सिटी)

१९७२ (म्युनिक)

२०२० (टोकियो, २०२१ मध्ये पार पडले)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT