Sports

Paris Olympics: हरमनप्रीत सिंहच्या हॉकी स्टिकने ओकली आग; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाच्या कर्णधाराचा पराक्रम

Paris Olympics: टीम इंडियाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दोन्ही वेळा हरमनप्रीत सिंहने आपल्या तुफानी ड्रॅग फ्लिकने टीम इंडियासाठी स्पर्धेत सर्वाधिक गोल केले.

Bharat Jadhav

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही. तब्बल ४४ वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्याची संधी होती. परंतु जर्मनीने टीम इंडियाचा पराभव केला. दरम्यान अंतिम फेरी जरी गाठली नसले तरी भारतीय संघाने एकदा पदक जिंकून ऑलिम्पिकमधून परतलीय.

टीम इंडियाने रोमहर्षक कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव केला. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार संघाचा कर्णधार ठरलाय. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार कर्णधार हरमनप्रीत सिंहने टीम इंडियासाठी दोन गोल केले. अशाप्रकारे टोकियो ऑलिम्पिकनंतर भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकलंय.

या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीतने आपल्या हॉकी स्टिकने गोल करत मोठा पराक्रम केलाय. या संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी दमदार कामगिरी संपूर्ण स्पर्धेत केलीय. शेवटच्या वेळी भारताकडून खेळत असलेला अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश याने संपूर्ण स्पर्धेत भिंतीसारखा मोर्चा संभाळला होता, तर त्याच्यासह इतर बचावपटूंनीही गोलचा भक्कम बचाव केला.

गोल पोस्टचा बचाव करण्यासह प्रतिस्पर्धींच्या गोल पोस्टमध्ये चेंडू ढकलण्याची कामही महत्त्वाचे असते. ही कामगिरी कर्णधार हरमनप्रीत सिंहने चोखपणे पार पाडलीय. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हरमनप्रीत सिंहने पुढे येऊन दमदार कामगिरीने संघाचे नेतृत्व केले.

स्पर्धेत सर्वाधिक गोल

हरमनप्रीत सिंहने ऑलिम्पिकमध्ये एक अप्रतिम कामगिरी केलीय. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यापासून हरमनप्रीतने त्याच्या स्फोटक ड्रॅग फ्लिकने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय.संघाची पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीतने ग्रुप स्टेजच्या ५ पैकी ४ सामन्यात (पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा) गोल केले. यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध, उपांत्य फेरीत जर्मनी आणि कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनविरुद्ध गोल केले. स्पेनविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंहने संघासाठी दोन गोल केले. अशाप्रकारे संपूर्ण स्पर्धेत भारतीय कर्णधाराने सर्व संघांमध्ये सर्वाधिक १० गोल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे नावाचा माणूस बिनडोक, राज्यात विष पेरण्याचे काम केले; या नेत्याचा गंभीर आरोप|VIDEO

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

SCROLL FOR NEXT