Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेची रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात; हरमनप्रीत-लवलीनाकडून भारताचं नेतृत्व, पाहा व्हिडिओ

Asian Games 2023: चीनच्या झांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचा धमाकेदार उद्घाटन सोहळा पार पडला आहे.
Asian Games 2023:
Asian Games 2023:Saam tv
Published On

Asian Games 2023:

चीनच्या झांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेची सुरुवात रंगारंग कार्यक्रमाने झाली. या सोहळ्यात देशाचं भारतीय हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि बॉक्सर लवलीना बोरगोहेनने नेतृत्व केलं. तसेच कार्यक्रमादरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग उपस्थित होते. आशियाई क्रीडा स्पर्धेचा २०२३ मध्ये भारतात ६५५ खेळाडू सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यापूर्वी भारतात ५७२ खेळाडूंनी भाग घेतला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यंदा ४५ देशांचे १२ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यंदा क्रिकेट खेळाचाही सामावेश करण्यात आला आहे.

Asian Games 2023:
Sports News: खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यात आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१४ मध्ये क्रिकेट खेळाचाही सामावेश करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने संघ पाठवला नव्हता. मात्र, यंदा बीसीसीआयने टीम इंडियाचे महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ पाठवले आहेत.

भारतीय क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकणार का?

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१० मध्ये बांगलादेश पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं. तर पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धा २०१४ मध्ये श्रीलंकेच्या पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं. तर २०१४ मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं.

Asian Games 2023:
Varanasi Cricket Stadium: वाराणसी होणार शिवमय; PM मोदींनी केलं क्रिकेट स्टेडियमचं भूमीपुजन, कार्यक्रमाला दिग्गज मंडळीची हजेरी

क्रिकेट व्यतिरिक्त रेसलिंग, बॅटमिंटन आणि बॉक्सिंग सारख्या खेळात सुवर्णपदक मिळावं अशी भारतीयांची अपेक्षा असणार आहे.

Asian Games 2023:
World Cup Prize Money: वर्ल्डकप स्पर्धेत विजेता, उपविजेता संघ होणार मालामाल; ICC कडून बक्षिसांची यादी जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com