Virat Kohli Mehendra Singh Dhoni
Virat Kohli Mehendra Singh Dhoni Saamtv
क्रीडा | IPL

Virat Kohli: लालची कोहली! कर्णधारपदासाठी थेट धोनीशी नाते संपवणार होता विराट, आत्मचरित्रातून झाला धक्कादायक खुलासा

Gangappa Pujari

Virat Kohali: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीच्या आयुष्यात महेंद्रसिंग धोनीचे स्थान जगजाहीर आहे. आपल्या जबरदस्त कारकिर्दिचे सारे श्रेय मेहेंद्रसिंग धोनीला असल्याचे तो नेहमीच मान्य करतो. इतकेच नव्हेतर महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करण्याची एकही संधी तो सोडत नाही. असे असले तरी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचे हे नाते तुटण्याच्या मार्गावर होते. आणि याला कारण होते, भारतीय संघाचे कर्णधारपद.

विराट कोहली (Virat Kohli) धोनीकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यासाठी त्याच्याशी नाते तोडणार होता. असा खुलासा माजी प्रशिक्षकांनी त्यांच्या आत्मचरित्रातून केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारताचे माजी फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी कोचिंग बियोन्ड हे आत्मचरित्र लिहले आहे. याच पुस्तकातून त्यांनी हा दावा केला आहे. आर. श्रीधरे हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात पान नं ४२ वर हा धक्कादायक खुलासा केला आहे.

यामध्ये खुलासा करताना त्यांनी लिहले आहे की, 'विराट कोहलीला भारतीय संघाचे एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद मिळवायचे होते. यासाठी तो आग्रही होता. मात्र विराटच्या या हट्टाला रवी शास्त्री यांनी ब्रेक लावला होता. रवी शास्त्री यांनी विराटला कॉल करुन याबद्दल घाई न करण्याचा 'सल्ला दिला होता.

पुस्तकामध्ये याबद्दलचा खुलासा करताना त्यांनी लिहले आहे की, "एका संध्याकाळी विराटला रवी शास्त्री यांनी फोन केला, आणि त्याला सांगितले हे बघ विराट, महेंद्रसिंग धोनीने तुला टी ट्वेंटीचे कर्णधारपद दिले आहे. तो तुला एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद देईल, मात्र यासाठी योग्य वेळेची वाट पाहा, संघातील धोनीचे योगदान आणि त्याचा आदर तुला करावाच लागेल."

दरम्यान, याच काळात २०१७ मध्ये महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले होते. ज्यानंतर विराटकडे सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद देण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT