Beed News
Beed NewsSaam tv

Beed News: बेरोजगारीने घेतला बळी; डी.एड्‌ होवूनही नोकरी नसल्‍याने तरुणाचे टोकाचे पाऊल

बेरोजगारीचा बळी; डी.एड्‌ होवूनही नोकरी नसल्‍याने तरुणाचे टोकाचे पाऊल
Published on

बीड : बेरोजगारीला कंटाळून एका 34 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील काळेगावघाट येथे घडली. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Live Marathi News)

Beed News
Jalgaon News: ३३ लाखांचा साबण घेऊन ट्रकमालक फरार; भाड्याची रक्‍कमही दिलेली

मयत दयानंद गाताडे याने डी.एडचे शिक्षण (Education)घेतले होते. तो मागील काही वर्षांपासून शिक्षकाच्या नोकरीच्या शोधात होता. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो हताश झाला होता. शेवटी बेरोजगारीला कंटाळून दयानंदने घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांकडून पंचनामा

बेरोजगारीने तरुणाचा बळी घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान अविनाश रामचंद्र गाताडे यांच्या खबरेवरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com