Jalgaon News: ३३ लाखांचा साबण घेऊन ट्रकमालक फरार; भाड्याची रक्‍कमही दिलेली

३३ लाखांचा साबण घेऊन ट्रकमालक फरार; भाड्याची रक्‍कमही दिलेली
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचा संतूर साबण सांगितलेल्या ठिकाणी न पोचल्याने अमळनेर (Amalner News) पोलिसात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

Jalgaon News
Two Injured In Road Accident : ट्रक - कार अपघातात युवती ठार, दाेन जण जखमी

विप्रो कंपनीचा साबणाचा माल तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून ट्रकचा चालक कैलाश श्रीराम गुजर (रा. भानूनगर, ता. जहाजपूर, जि. भिलवाडा, राजस्थान) व मालक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर (रा. मुरलीविहार, देवरौठा शाहगंज, आग्रा, उत्तरप्रदेश) यांच्या मालकीचा ट्रक भाड्याने घेतला होता. ४ जानेवारीला या वाहनात विप्रो कंपनीतून १८ टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टमार्फत ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून गाडी भरण्यात आली होती.

ट्रक पोहचलाच नाही, मोबाईलही बंद

चालक व मालक यास ५० हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली होती. ९ जानेवारीला ट्रक तुमकूर येथे पोचणे आवश्यक होते. मात्र माल त्या ठिकाणी पोचला नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद येत आहेत. त्यामुळे त्यांनी विश्वासघात करून ट्रकमधील ९८० बॉक्स सुमारे १८ टन १०० किलो वजनाचे सुमारे ३३ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा माल अपहार केल्याचे दिसून येत आहे. लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com