manu bhaker  twitter
Sports

Manu Bhaker Medals: मनू भाकरला Paris Olympics मध्ये जिंकलेले मेडल्स परत करावे लागणार; जाणून घ्या कारण

Manu Bhaker Will Return Paris Olympics Medals: भारताची स्टार नेमबाज मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलेले मेडल्स परत करावे लागणार आहेत. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. मनूने शूटिंग प्रकारात २ ब्राँझ मेडल जिंकून इतिहास रचला होता. मात्र आता दोन्ही मेडल तिला परत द्यावे लागणार आहेत. मनूने जे पदक जिंकले होते ते खराब अवस्थेत होते. त्यामुळे आता मोनाई डे पेरिस या पदक बनवणाऱ्या कंपनीने तिला नवीन पदकं देण्याचा निर्णय घेतला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जी पदकं देण्यात आली होती. त्याचा रंग जातोय, त्यामुळे केवळ मनू नव्हेतर, जगभरातील खेळाडूंनी ही तक्रार केली होती. काही खेळाडूंनी त्यांची पदकं खराब अवस्थेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने याची दखल घेतली.

आता मोनाई डे पेरिस या कंपनीला ही पदकं दुरुस्त करुन खेळाडूंना परत करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पदक बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट याच कंपनीला देण्यात आला होता.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जी पदकं तयार करण्यात आली होती. ती अतिशय खास होती. कारण ही पदकं बनवण्यासाठी पॅरिसच्या आयफील टॉवरच्या लोखंडाचा वापर करण्यात आला होता. या कंपनीने आयफील टॉवरच्या लोखंडाचा वापर करुन एकूण ५,०८४ पदकं तयार केली होती.

मनू भाकरची रेकॉर्डब्रेक कामगिरी

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. तिने या स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई केली होती. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात तिने सरबज्योत सिंगसोबत मिळून पदक जिंकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT