indian cricketer r ashwin back hardik pandya over rohit sharma vs hardik pandya debate in fans  yandex
क्रीडा

Rohit Sharma vs Hardik Pandya: हार्दिक पंड्याला आर अश्विनचा फुल्ल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला झापलं; म्हणाला, 'विसरु नका...'

R Ashwin On Hardik Pandya: मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद मिळाल्यापासूनच हार्दिक पंड्या फॅन्सच्या रडारवर आहे. जेव्हापासून त्याने गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद सोडून मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला आहे तेव्हापासून त्याला ट्रोल केलं जात आहे.

Ankush Dhavre

R Ashwin Backs Hardik Pandya:

मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद मिळाल्यापासूनच हार्दिक पंड्या फॅन्सच्या रडारवर आहे. जेव्हापासून त्याने गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद सोडून मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला आहे तेव्हापासून त्याला ट्रोल केलं जात आहे. मुंबईचे फॅन्स रोहित शर्माला समर्थन करताना दिसून येत आहेत. तर हार्दिकच्या विरोधात घोषणा देताना दिसून येत आहेत. दरम्यान भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन हार्दिक पंड्याला समर्थन करताना दिसून आला आहे.

आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघातील काही सदस्य रोहित शर्माच्या बाजूने तर काही सदस्य हार्दिक पंड्याच्या बाजूने असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत बोलताना आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे. (Cricket news in marathi)

अश्विनचा हार्दिकला पाठिंबा...

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्या बाद होऊन बाहेर जात असताना प्रेक्षक रोहित..रोहितच्या घोषणा देत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता आर अश्विन हार्दिकला समर्थन करताना दिसून आला आहे. दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी खेळतात असंही त्याने म्हटले आहे.

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन म्हणाला की, 'प्रेक्षकांनी असं करायला नको. हे दोन्ही खेळाडू कोणत्या देशाकडून खेळतात हे सर्वांना माहित असायला हवं. तुम्हाला जो खेळाडू आवडतो त्याचं नक्कीच कौतुक करा. मात्र दुसऱ्या खेळाडूला कमीपणा दाखवू नका. मला हिच गोष्ट आपल्या देशातून काढून टाकायला आवडेल.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'तुम्ही हे दुसऱ्या देशात होताना पाहिलं आहे का? तुम्ही कधी रुट- बटलर किंवा स्मिथ - कमिन्सच्या चाहत्यांना भांडताना पाहिलं आहे का? हे फक्त आपल्याच देशात पाहायला मिळतं. हे कुठेतरी थांबायला हवं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT