Indian Cricketer Deepak Chahar Slams Kunika Saam
Sports

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Deepak Chahar Defends Malti Over Lesbian Remark: बिग बॉस १९ च्या फॅमिली विकमध्ये भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहरची एन्ट्री. कुनिकाच्या वादग्रस्त वक्तव्यावर दीपक चाहरची कडक नाराजी.

Bhagyashree Kamble

बिग बॉस १९ सध्या चर्चेत आहे. नुकतेच बिग बॉसचा फॅमिली वीक संपला. विकेंडला भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर बिग बॉसच्या घरात आला. घरात स्पर्धकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे या आठवड्यात एकंदर घरातील वातावरण आनंदी दिसत होतं. अनेकांचे रूसवे - फुगवे दूर झाले असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मालतीविषयी केलेल्या एका विधानामुळे दीपकने नाराजी व्यक्त केली.

अलीकडेच कुनीकाने तान्याशी संभाषणात म्हटलं होतं की, तिला मालती ही लेस्बियन आहे, अशी शंका वाटते. या वक्तव्यावर दीपक ने बिग बॉसच्या घरात येऊन आक्षेप घेतला. तसेच दीपक चाहरने कुनीकाला उद्देशून म्हटलं की, 'तुम्ही एखाद्या व्यक्तीला लेस्बियन किंवा गे म्हणाल तर कसं चालेल. हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही चुकीचे बोलत आहात, पण तुम्ही १०० टक्के खात्रीने सांगितलात का? की, समोरची व्यक्ती लेस्बियन आहे. जे अत्यंत चुकीचे आहे'.

'खरंतर मी इथे काही भांडायला आलो नाही आहे. फक्त माझं मत सांगायला आलो आहे. मालतीचं लग्न झालेलं नाही. एखादी व्यक्ती अविवाहित असल्यामुळे तिच्याबद्दल अशी विधानं करणं चुकीचं आहे. यामुळे लोकांमध्ये तिच्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार होऊ शकतो', असं दीपक बिग बॉसच्या घरात म्हणाला.

यावर मालतीने आपल्या भावाला कुनिकाच्या मुलानं माफी मागितली असल्याचं सांगितलं. मालतीनं सांगितलं की, 'कुनिकाचा मुलगा अयानने जेव्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. तेव्हा त्यानं माझी माफी मागितली होती. पण त्यानं माझी माफी का मागितली? हे मला अजून कळलं नाही', असं मालती म्हणाली. यानंतर कुनिकाने आपली बाजू मांडली. तिनं सांगितलं की, 'माझा उद्देश चुकीचा नव्हता. मालतीच्या वर्तणुकीमुळे लोकांचा तसं वाटू शकतं. एवढंच मी म्हणाले होते', असं कुनिका म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

Brinjal Dishes : वांग्याच्या ५ सोप्या अन् चविष्ट रेसिपी, आताच नोट करा साहित्य-कृती

SCROLL FOR NEXT