'मी मराठी आहे, बिहारींचं ऐकणार नाही', बॉसला अद्दल घडवण्यासाठी महिलेनं घेतली मनसे कार्यकर्त्यांची मदत, VIDEO व्हायरल

MNS Workers Attack Employer Over Language Dispute: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदी मराठी वाद. भाषा वादातून हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल. हिंदी भाषिक बॉसला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप.
MNS Workers Attack Employer Over Language Dispute
MNS Workers Attack Employer Over Language DisputeSaam
Published On

महाराष्ट्रात हिंदी - मराठी वाद काही नवीन नाही. मुख्यत: मुंबईत हिंदी - मराठी भाषिक वाद वारंवार दिसून येतो. असाच एका प्रकार सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून समोर आला आहे. या व्हिडिओत एका हिंदी भाषिक बॉसला मनसे कार्यकर्ते आणि एका महिलेनं बेदम मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बॉसनं महिला कर्मचाऱ्याला वेळेवर कामावर येण्यास सांगितले होते. मात्र, महिलेनं त्याला विरोध करत, 'मी मराठी आहे, तुमच्या आदेशाचे पालन करणार नाही', असा धमकीवजा इशारा दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मालकावर हल्ला केला असल्याचे व्हिडिओतून दिसते.

MNS Workers Attack Employer Over Language Dispute
ऐन निवडणुकीत अजित दादांच्या गटात धुसफूस, आमदाराची 'मुंडेंना पाठवू नकाच', अशी मागणी; कारण काय?

१ मिनिट २६ सेकंदाचा हा व्हिडिओ एक्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. मारहाण झालेला बॉस बिहारचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये २ पिवळ्या रंगाचे शर्ट घातलेले पुरूष दिसत आहे. सुरूवातीला ते एकमेकांशी चर्चा करताना दिसून येत आहे. त्यानंतर बॉस खुर्चीवर येऊन बसतात. मालक बोलायला सुरूवात करतात, नंतर २ पुरूष त्यांच्यावर हात उगारतात.

MNS Workers Attack Employer Over Language Dispute
पुण्यातील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; विदेशी महिलांचा बाजार, पोलिसांनी 'असा' उघडा पाडला डाव

नंतर व्हिडिओच्या फ्रेममध्ये एक महिला येते. महिला देखील, 'मी मराठी आहे. हा माझा महाराष्ट्र आहे. इथे बिहारी माणसांचं नाही चालणार, फक्त माझंच चालणार', असं म्हणताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी भाषिक बॉसने महिलेला कामावर वेळेवर येण्यास सांगितले होते. या कारणावरून महिलेनं मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिक बॉसला कानशिलात लगावून मारहाण केली. अखेरीस एक व्यक्ती या प्रकरणात हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हिंदी भाषिक बॉसवर हात उगारण्यामागचं कारण काय? याचा शोध सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com