Cheteshwar Pujara retirement saam tv
Sports

Cheteshwar Pujara: चांगल्या गोष्टीचा कधीतरी अंत होतोच...! चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Cheteshwar Pujara retirement news: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा अनुभवी आणि 'कसोटी क्रिकेटचा स्पेशालिस्ट' फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा सर्वात विश्वासू आणि खंबीर टेस्ट फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा याने रविवारी सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही काळापासून त्याला टेस्ट टीममध्ये संधी देण्यात येत नव्हती. अखेर त्याने आज निवृत्तीचा निर्णय घेतला.

पुजारा झाला भावूक

सोशल मीडियावर पुजारा म्हणाला, “भारतीय जर्सी घालणं, राष्ट्रगीत वाजणं आणि प्रत्येक वेळी मैदानात उतरून सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न करणं या सगळ्याचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कधीतरी अंत होतोच. त्यामुळे मनात अपार कृतज्ञता ठेवून मी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.”

टेस्ट करिअरमधील कामगिरी

पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि १०३ टेस्ट सामन्यांमध्ये ७,१९५ रन्स केले आहेत. त्याचा सरासरी ४३.६१ इतकी ठरली. या प्रवासात त्याने १९ शतकं आणि ३५ अर्धशतकं झळकावली. टेस्टमधील त्याची सर्वोच्च स्कोर २०६ आहे. वडे क्रिकेटमध्ये त्याने फक्त पाच सामने खेळले आणि ५१ रन्स केले आहेत.

परदेशी दौर्‍यांवरील आधारस्तंभ

पुजारा आपल्या खंबीर फलंदाजी तंत्रासाठी आणि संयमासाठी जगभर प्रसिद्ध होता. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक टेस्ट सिरीजमध्ये भारताने मिळवलेल्या विजयांमध्ये त्याचा मोठा वाटा राहिला. कठीण परिस्थितीत क्रीजवर टिकून राहून टीमचा डाव सावरण्याची क्षमता त्याच्या नावाशी कायम जोडली गेली.

३७ वर्षीय पुजाराने शेवटचा टेस्ट सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्व टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला. त्यानंतर तो भारतीय टीमबाहेर राहिला मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत खेळावरील आपलं प्रेम दाखवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन

Shahi Tukra Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी शाही टुकडा, वाचा सोपी रेसिपी

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक, विवाहसोहळा रद्द

पुण्यात खळबळ! चिमुकल्या बहीण - भावाचा मृतदेह शेततळ्यात सापडला, बिबट्याचा हल्ला की आणखी काही?

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT