
IND vs WI 1st ODI Rohit Sharma Virat Kohli Record: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग हे दोघे जेव्हा भारतीय संघासाठी खेळायचे त्यावेळी ही जोडी जय वीरूची जोडी म्हणून ओळखली जायची. वर्तमान भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी जय वीरूची जोडी म्हणून ओळखली जाते.
दोघांनी मिळून भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. या जोडीच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. आता या विक्रमांच्या यादीत आणखी एका मोठ्या विक्रमाची भर पडणार आहे. (Virat Kohli- Rohit Sharma Record)
रोहित- विराटच्या नावे होणार मोठ्या विक्रमाची नोंद..
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जोडीने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये खेळताना ४९९८ धावा केल्या आहेत. आज होणाऱ्या सामन्यात केवळ २ धावा करताच ही जोडी वनडे क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पुर्ण करणार आहे.
असा कारनामा करणारी ही ८ वी जोडी ठरणार आहे. दोघांनी मिळून ८५ इंनिंगमध्ये ६२.४७ च्या सरासरीने ४९९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान दोघांनी १८ शतकी तर १५ वेळेस अर्धशतकी भागीदारी केली आहे.
सचिन तेंडुलकर -सौरव गांगुलीची जोडी अव्वल स्थानी..
माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची जोडी या यादीत अव्वल स्थानी आहे. या दोघांनी १७६ इंनिगमध्ये ४७.५५ च्या सरासरीने ८२२७ धावा जोडल्या आहेत. यादरम्यान दोघांनी २६ वेळेस शतकी तर २९ वेळेस अर्धशतकी भागीदारी केली. (Latest sports updates)
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या..
१.सचिन तेंडुलकर -सौरव गांगुली : ८२२७ धावा
२.महेला जयवर्धने - कुमार संगकारा : ५९९२ धावा
३.तिलकरत्ने दिलशान- कुमार संगकारा : ५४७५ धावा
४.एमएस अटापटू - सनथ जयसुर्या : ५४६२ धावा
५.अॅडम गिलख्रिस्ट- मॅथ्यू हेडेन : ५४०९ धावा
६.सीजी ग्रीनिज- डीएल हेन्स : ५२०६ धावा
७.शिखर धवन- रोहित शर्मा : ५१९३ धावा
८. विराट कोहली -रोहित शर्मा : ४९९८ धावा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.