rohit sharma yandex
Sports

Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी संघातून सुट्टी होणार? ही आहेत ३ प्रमुख कारणं

Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला. हा विजय जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात मिळवला होता.

आता दुसऱ्या कसोटीत रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला. यासह कर्णधार म्हणूनही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

दरम्यान आता बीसीसीआयने रोहितला मागे सोडून भविष्याचा विचार करायला हवा. जाणून घ्या ३ प्रमुख कारणं.

रोहित शर्माचा फ्लॉप शो

  • रोहित आधी मधल्या फळीत फलंदाजी करायचा. त्यानंतर त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. इथून त्याच्या कारकिर्दीची गाडी ट्रॅकवर आली.

  • रोहितचा गेल्या १२ कसोटी सामन्यातील रेकॉर्ड टेन्शन वाढवणारा आहे. रोहितने १२ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान रोहितला २७.१४ च्या सरासरीने अवघ्या ५९७ धावा करता आल्या आहेत. वेगवान गोलंदाजांचे स्विंग होणारे चेंडू कसे खेळायचे, हे रोहित विसरुन गेलाय, असंच चित्र दिसतंय.

कर्णधार बदलण्याची गरज

  • काही दिवसांपूर्वीच रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना, भारताला मायदेशात खेळताना क्लिन स्वीपचा सामना करावा लागला होता. त्याआधी भारताला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

  • रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये दमदार रेकॉर्ड राहिला आहे. मात्र कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये त्याला आपली छाप सोडता आलेली नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघबांधणी करण्याची योग्यवेळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही सायकल सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. आता भारतीय संघाने पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करायला हवं. त्यामुळे संघबांधणी करावी लागेल. आता रोहितनंतर भारताला सलामीवीर फलंदाज शोधायला हवा,यासह कर्णधाराचाही शोध घ्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT