
Rohit Sharma News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. आता रोहितच्या नेतृत्वात भारताने हा सामना गमावला. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता रोहितने कर्णधार म्हणून सलग चौथा सामना गमावला आहे. दरम्यान रोहित शर्मा कर्णधार म्हणून फ्लॉप का ठरतोय? यामागचं कारण हरभजन सिंगने सांगितलं आहे.
हरभजन सिंगच्या मते, त्याच्या फलंदाजीमुळे तो नेतृत्वातही फ्लॉप ठरतोय. वर्षातील सुरुवातीच्या ६ सामन्यांतील आकडेवारी पाहिली, तर रोहितने फलंदाजी करताना ४५.५० च्या सरासरीने ४५५ धावा केल्या होत्या.
या ६ पैकी ५ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद केली होती. तर गेल्या ६ सामन्यातील आकडेवारी पाहिली, तर त्याने २३.६६ च्या सरासरीने अवघ्या १४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान भारताने ६ पैकी ४ सामने गमावले आहेत.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की,' जेव्हा इतका मोठा स्टार खेळाडू धावा करताना संघर्ष करतो, ही नक्कीच चिंतेची बाब आहे. आम्हाला चांगलत माहित आहे, त्याच्याकडे ते कौशल्य आहे. त्याने भारतीय संघासाठी खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र त्याला या सामन्यात धावा करता आलेल्या नाहीत. यापूर्वी झालेल्या मालिकेतही त्याला धावा करता आलेल्या नाहीत. जेव्हा फलंदाज धावा करत नसतो, तेव्हा त्याच्यावर दबाव येतो. मला मुळीच असं वाटत नाही, की भारती कर्णधारावर धावा करण्याचा प्रेशर असावा. कारण त्याचा परिणाम संघाच्या नेतृत्वावर दिसून येतो.
तसेच तो पुढे म्हणाला की, ' मी अशी आशा करतो की, येणाऱ्या सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये परतेल. मागे काय झालं, याचा त्याने विचार करुच नये. इथून पुढे चांगलं कसं करता येईल, यावर त्याने लक्ष केंद्रीत करावं. कारण संघ हा त्याच्या फॉर्मपेक्षा जास्त महत्वाचा आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.