IND vs ENG: टीम इंडियाने करुन दाखवलं! फायनलमध्ये पोहोचताच रोहितला अश्रू अनावर, पाहा भावुक करणारा VIDEO
rohit sharma  twitter
क्रीडा | T20 WC

IND vs ENG: टीम इंडियाने करुन दाखवलं! फायनलमध्ये पोहोचताच रोहितला अश्रू अनावर, पाहा भावुक करणारा VIDEO

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली आहे. गयानाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवत तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१४ नंतर भारतीय संघाने पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान या कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात तो भावुक झाल्याचं दिसून येत आहे.

जसप्रीत बुमराहने जोफ्रा आर्चरला पायचीत केलं आणि फायनलच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केलं. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंसह क्रिकेट फॅन्स एकच जल्लोष करताना दिसून आले. दरम्यान खेळाडू ज्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जात होते, त्यावेळीही खेळाडू जल्लोष करताना दिसून येत होते. मात्र रोहित शर्मा एका कोपऱ्यात बसून होता. तो भावुक झाला होता, त्याला अश्रू अनावर झाले होते. विराट कोहली,सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जडेजाने त्याला कौतुकाची थाप दिली. हा भावुक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने प्रवेश केला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने अजेय राहत फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्येही भारतीय संघाला फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे यावेळी रोहित शर्माकडे भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकून देण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT