नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचली. टीम इंडिया यशस्वीरित्या स्पर्धेच्या फायनलला पोहोचली असून आता सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. टीम इंडियाती फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर इंग्लंडने गुडघे टेकले. सेमी फायनलमधील विजयासहित भारताने २ वर्षांपूर्वीचा बदलाही घेतला आहे.
मागील टी-२० विश्वचषक २०२२ साली सेमीफायनमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचे १० गडी बाद करून विजय मिळवला होता. इंग्लंडच्या विजयाने भारताला स्पर्धेबाहेर जावं लागलं. आता रोहित शर्माच्या ब्रिगेडचा त्याचा पराभवाचा वचपा काढत फायनलमध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघात गुयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये सामना झाला.
स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंडला १७२ धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंग्लंड १०३ धावांवर गारद झाली. या पराभवामुळे इंग्लंडने फायनलमध्ये धडकण्याची संधीही गमावली. इंग्लंडच्या एकही फलंदाजांनी आक्रमक खेळी दाखवली नाही.
भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्याची एकही संधी दिली नाही. हॅरी ब्रूक २५, कर्णधार बटलर २३, जोफ्रा आर्चरने २१, लियाम लिव्हिंगस्टोनने ११ धावा कुटल्या. या फलंदाजांव्यतिरिक्त एकही खेळाडूला दहाच्या आकड्यापर्यंत मजल मारता आली नाही. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव, अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. जसप्रीत बुमरहाने २ गडी बाद केले.
टीम इंडियाने नाणेफेक हरल्यानंतर ७ गडी गमावून १७१ धावा कुटल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने ३६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने ३९ चेंडूत ५७ धावांची आक्रमक खेळी खेळली. त्याने या डावात २ षटकार आणि ६ चौकार लगावले. तर सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ४७ धावा कुटल्या होत्या.
हार्दिक पंड्याने १३ चेंडूत २३ धावा कुटल्या. रवींद्र जडेजाने ९ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डनने टीम इंडियचे सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर रीस टॉप्ली, जोफ्रा आर्चर, सॅम करन आणि रशीदने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.