Shreyas Iyer Statement Twitter
क्रीडा

Shreyas Iyer Statement: 'शॉर्ट बॉल'विषयी विचारलेल्या प्रश्नावर श्रेयस अय्यर भडकला! म्हणाला,'तुम्हाला दिसलं नाही का..?'

Shreyas Iyer Gets Angry In Press Conference: पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Shreyas Iyer Gets Angry In Press Conference:

भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यरने वानखेडेच्या मैदानावर ८२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ३५७ धावांचा डोंगर उभारला.

गेल्या काही सामन्यांमध्ये तो शॉर्ट बॉलविरुद्ध फलंदाजी करताना अडचणीत येत होता. या बॉलवर तो अनेकदा बादही झाला. दरम्यान श्रीलंकेच्या गोलंदाजांनी देखील त्याला शॉर्ट बॉलच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो काही बाद झाला नाही. दरम्यान या सामन्यानंतर त्याला शॉर्टबद्दल प्रश्न विचारण्यात आला.या प्रश्नाचं उत्तर देताना तो भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. (Shreyas Iyer)

हा सामना झाल्यानंतर श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. त्यावेळी श्रेयस अय्यरला शॉर्ट बॉलविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत श्रेयस अय्यर म्हणाला की, 'तुम्ही मला म्हणता ही(शॉर्ट बॉल) माझ्यासाठी समस्या आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? मी किती पुल शॉट मारले, हे तुम्ही पाहिलं का? त्यापैकी काही बॉल बाऊंड्रीपार ही गेले आहेत. जेव्हा तुम्ही कोणताही बॉल मारण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचं बाद होणं निश्चित आहे. मग तो शॉर्ट बॉल असो की ओव्हरपीच बॉल. जर मी तीन वेळा त्रिफळाचित झालो तर तुम्ही म्हणाल मी इनस्विंग बॉल खेळू शकत नाही. जर बॉल वेगाने येत असेल तर मी कट खेळू शकत नाही.'

गेल्या काही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर शॉर्ट बॉलविरुद्ध खेळताना बाद झाला आहे. त्यामुळे तो शॉर्ट बॉलवर फलंदाजी करु शकत नाही अशा चर्चा सुरु आहेत. या चर्चांना पुर्णविराम देत तो म्हणाला की,' एक फलंदाज म्हणून आम्ही कुठल्याही बॉलवर बाद होऊ शकतो. तुम्हीच असा माहोल बनवलाय की, श्रेयस अय्यर शॉर्ट बॉल खेळू शकत नाही. मला वाटतं की तुम्ही हेच लावून धरलं आहे. सातत्याने तुमच्या डोक्यात हेच सुरु असतं.तुम्ही यावरच काम करत राहा. (Latest sports updates)

श्रेयस अय्यरने या सामन्यात फलंदाजी करताना ५६ बॉलमध्ये ८२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचं शतक अवघ्या १८ धावांनी हुकलं.

या खेळीदरम्यान त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारला आहे. त्याने फलंदाजी करताना १०६ मीटरचा षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT