World Cup Points Table: भारत - पाकिस्तानात होणार WC ची सेमीफायनल! टीम इंडियाच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलचं समीकरण बदललं..

World Cup 2023 Semi Final Scenario: भारतीय संघाच्या विजयानंतर पाकिस्तानचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे.
World Cup Points Table
World Cup Points TableSaam tv news
Published On

World Cup 2023 Semi Final Scenario:

भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सलग ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

यासह भारतीय संघ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरल्यानंतर आता उर्वरीत ३ जागांसाठी ५ संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

या शर्यतीत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्ताना हे संघ शर्यतीत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ आघाडीवर..

टेम्बा बावूमा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृ्त्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत.

यापैकी ६ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला आहे. १२ गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचे पुढील २ सामने भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसोबत होणार आहे. या २ पैकी १ सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो.

ऑस्ट्रेलियालाही संधी...

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी १४ गुणांची गरज आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलियालाही १४ गुणांपर्यंत मजल मारण्याची संधी आहे. या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत.

यापैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे पुढील सामने अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या संघाविरुद्ध होणार आहे. ह सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. (Latest sports updates)

World Cup Points Table
IND vs SL: वानखेडेवर इतिहास घडला! शतक हुकलं पण विराटने सचिनसमोरच तोडला मोठा रेकॉर्ड

न्यूझीलंड,अफगाणिस्तान अन् पाकिस्तानलाही संधी..

न्यूझीलंडने या सामन्यात दमदार सुरुवात केली होती. मात्र गेल्या ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता न आल्याने न्यूझीलंडच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. न्यूझीलंडने सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तर पुढील ३ सामने गमावत न्यूझीलंडचा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. जर पुढील २ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला. तर न्यूझीलंडचा संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

अफगाणिस्ताननेही या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. ६ गुणांसह अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. या दमदार कामगिरीसह अफगाणिस्तानचा संघदेखील वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

World Cup Points Table
Mohammed Shami: शार्प माइंड शमी ! आधी इन मग आऊट स्विंग अन् दांडी गुल; स्टोक्सला बाद करण्यासाठी असा रचला सापळा, Video

पाकिस्तानचा संघही शर्यतीत..

भारतीय संघाच्या विजयाने पाकिस्तानचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानने ७ पैकी ३ सामने जिकंले आहेत. ६ गुणांसह पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानने जर पुढील २ सामने मोठ्या फरकाने जिंकले. तर पाकिस्तानचा संघही सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. मात्र त्यासाठी पाकिस्तानला दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com