World Cup 2023: मुंबईत घोंघावलं शमी वादळ!! ५ विकेट्स घेत दिग्गजांना मागे सोडलं; या बाबतीत बनलाय नंबर १

India vs Srilanka Record: या सामन्यात मोहम्मद शमीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
mohammed shami
mohammed shamitwitter
Published On

Mohammed Shami Record News:

वानखेडेच्या मैदानावर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. या सामन्यात मोहम्मद शमीने वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

या बाबतीत त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ आणि जहीर खान यांना मागे सोडलं आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना हा त्याचा वर्ल्डकप स्पर्धेतील १४ वा सामना होता.

या सामन्यात ४५ वा गडी बाद करताच त्याने हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांच्या नावे प्रत्येकी ४४-४४ गडी बाद करण्याची नोंद आहे. (Mohammed Shami Record)

मोहम्मद शमीला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र हार्दिक पंड्या बाहेर होताच त्याला संघात स्थान मिळालं आणि त्याने संधीचं सोनं केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ५ षटक गोलंदाजी करून अवघ्या १८ धावा खर्च करत ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान त्याने १ निर्धाव षटक देखील टाकलं.

मोहम्मद शमीचा हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील तिसराच सामना होता. या ३ सामन्यांमध्ये त्याने दमदार गोलंदाजी करत १४ गडी बाद केले आहेत. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.

या संधीचं सोनं करत त्याने ५ गडी बाद केले आणि सामनावीर पुरस्कारही पटकावला. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ गडी आणि आता श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात ५ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

mohammed shami
IND vs SL: वानखेडेवर इतिहास घडला! शतक हुकलं पण विराटने सचिनसमोरच तोडला मोठा रेकॉर्ड

वनडेत भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारा गोलंदाज..

मोहम्मद शमीने वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत ३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची बरोबरी केली आहे. तर वनडे कारकिर्दीत त्याने ४ वेळेस असा कारनामा केला आहे.

यासह तो भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी भारतीय गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंगला मागे सोडलं आहे. या दोन्ही दिग्गज गोलंदाजांच्या नावे प्रत्येकी ३-३ वेळेस ५ गडी बाद करण्याची नोंद आहे.

mohammed shami
IND vs SL, Toss: श्रीलंकेला धोबीपछाड देण्यासाठी टीम इंडिया सज्ज! टॉस जिंकून श्रीलंकेचा बॉलिंगचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com