India women's national cricket team Twitter
Sports

Asia Cup 2024, IND V NEP: टेबल टॉपर टीम इंडिया नेपाळसोबत भिडणार! अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11

India W vs Nepal W Playing 11 Prediction: आज भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

श्रीलंकेत महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाला सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पाकिस्तान आणि युएईसोबत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. आज भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. हा सामना दांबुलातील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना युएईसोबत पार पडला. या सामन्यातही भारतीय खेळाडू चमकले आणि युएईवर ७८ धावांनी एकतर्फी विजय मिळवला.

नेपाळच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर नेपाळने युएईवर ६ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात या संघाला पाकिस्तानकडून ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी

भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत ४ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. तर २ पैकी १ सामना जिंकून नेपाळचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.

या सामन्यासाठी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय महिला क्रिकेट संघ: ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्‍मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, डी हेमलता, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव, तनुजा कंवर.

नेपाल महिला क्रिकेट संघ: काजल श्रेष्ठ (यष्टीरक्षक), बिंदू रावल, समझ खड़का, रोमा थापा, पूजा महतो, रूबीना छेत्री, इंदु बर्मा (कर्णधार), कबिता जोशी, सीता राणा मगर, कृतिका मरासिनी, कबिता कुंवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

SCROLL FOR NEXT