आजचा दिवस भारतीय क्रिकेटविश्वसाठी वाईट ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिला कसोटी सामना जिंकला. तर इकडे भारतात होत असलेल्या महिला क्रिकेटमध्येही भारताच्या हाती निराशा आली. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा दारूण पराभव झाला.(Latest News)
भारतीय कर्णधार (Indian captain) हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८३ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय महिला संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ विकेट राखत २८५ धावा करून सामना जिंकला. भारतीय महिला गोलंदाज (Bowler) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फटकेबाजी ४६.३ षटकात ४ बाद २८५ धावा करत सामना जिंकला. अशाप्रकारे कांगारू संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतलीय.
ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा आणि एलिस पेरी यांनी अर्धशतकं केली. एलिस पेरी आणि फोबी लिचफिल्ड यांनी ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. दोघांनी शतकी भागीदारी केली. तर कर्णधार अॅलिसा हिली शुन्य धावांवर बाद झाली. पेरी ७५ धावा करून बाद झाली, तर फोबी ७८ धावा करून बाद झाली. बेथ मुनीने ४२ धावा केल्या. तर ताहलिया ६८ आणि गार्डनर ७ धावांवर नाबाद राहिल्या.
जेमिमाह रॉड्रिग्ज आणि पूजा वस्त्राकर यांची शानदार खेळी
भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. शेफाली वर्मा पुन्हा एकदा आऊट ऑफ फॉर्म दिसली. अवघी एक धाव करून तिने आपली विकेट गमावली. डार्सी ब्राउनने तिचा त्रिफळा उडवला. यानंतर यस्तिका भाटियाने ऋचा घोषसोबत दुसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली.
ऋचाने २० चेंडूत ४चौकारच्या मदतीने २१ धावा केल्या, पण ती जास्त वेळ मैदानात टिकू शकली नाही. तर यास्तिकाच्या नशीबाने तिला साथ दिली नाही आणि ती आपलं अर्धशतकपासून वंचित राहिली. तिने ६४ चेंडूत ४९ धावा केल्या. दीप्ती शर्माही २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अमनजोत कौनने २० आणि स्नेह राणाने एका धावेचे योगदान दिले.
जेमिमाह रॉड्रिग्जच्या नशिबानेही तिला साथ दिली नाही. शतकासाठी अवघ्या १८ धावा बाकी असताना ती बाद झाली. तिने ७७ चेंडू ८२ धावा केल्या. पूजा वस्राकरने फटकेबाजीने अर्धशतक करत आपला जलवा दाखवला. परंतु ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनापुढे भारतीय महिला संघाला पराभवाची चव चाखावी लागली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.